क्राईम

आरोग्य विभागाचा पेपर फोडण्यात बीडचं रॅकेट!

By Keshav Kadam

December 07, 2021

15 लाख रुपयात पेपर फोडलाआरोपी प्रशांत व्यंकट बडगीरे याने डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड याच्याकडून 10 लाख तर शाम महादू मस्के यांच्या कडून 5 लाख रुपये घेऊन पेपर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्य प्रशासकी अधिकारी बडगीरे याने पेपर कुठून आणि कसा मिळवला याचा तपास पोलीस करीत आहेत. फोडलेल्या पेपरमध्ये 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवण्यात आली होती.

आणखी मोठे मासे गळाला लागणारआरोग्य विभागाचा हा पेपर नेमका कसा फोडण्यात आला याचा तपास पोलीस करीत आहेत. मात्र या रॅकेट मध्ये आरोग्य विभागातील आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. बीडवर मोठ्या प्रमाणावर संशयाची सुई फिरत आहे.