beed jilha parishad

कोरोना अपडेट

अखेर ठरलं! जि.प. गट, पं.स. गणांची संख्या जाहीर

By Shubham Khade

December 08, 2021

सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण किती वाढणार? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. अखेर सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक तालुक्यातील गट आणि गण संख्या जाहीर केली आहे.

  बीड जिल्हा परिषदेत पूर्वी 60 गट होते. नवीन रचनेनुसार आता जिल्ह्यात 9 जिल्हा परिषद गट वाढले आहेत. शिरूर आणि धारूर तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 जिल्हा परिषद गट वाढणार आहे. प्रत्येक गटात 2 पंचायत समिती गण असतात, त्याप्रमाणे 9 तालुक्यात 2 पंचायत समिती गण वाढणार आहेत.

अशी आहे तालुकानिहाय गट संख्याआष्टी 8, पाटोदा 4, शिरूर 4. गेवराई 10, माजलगाव 7, वडवणी 3, बीड 9, केज 7, धारूर 3, परळी 7 आणि अंबाजोगाई 7