अंबाजोगाई

गोवा राज्यातील दहा लाखांची दारु पकडली!

By Keshav Kadam

December 09, 2021

echo adrotate_group(3);

बीड दि.9 : बीड राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांना अंबाजोगाई शहरातील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिरासमोर अवैध दारुचा साठा केल्याची माहिती मिळाली. गुरुवारी राधानगर, पोखरी रोडवरील दिनेश सिद्धलिंग बिडवे याने गोवा राज्य विक्रीसाठी असलेल्या विविध विदेशी दारुच्या साठा आढळून आला. यावेळी 10 लाख 15 हजार 200 रुपयांची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात अधिक माहिती अशी की, दिनेश सिद्धलिंग बिडवे (रा.अंबिका नगर अंबाजोगाई) याने अंबाजोगाई शहरातील राधानगर पोखरी रोडवरील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर परिसरात अवैध दारुचा साठा केला होता. सदरील दारु जप्त करण्यात आली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 अ, ई, 80, 83, 84, 108 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मुंबई कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, बीड अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.डब्ल्यू कडवे, दुय्यम निरीक्षक एस.बी शेळके, आर.के घोरपडे, रशीद बागवान, एस.नायबळ, अरुण खाडे, जवान श्रीराम धस, सादेक अहमद, रुपसिंग जारवाल, प्रशांत मस्के वाहन चालक अशोक शेळके, राम डुकरे, कैलास जारवाल यांनी केली आहे. पुढील तपास सुरु असून अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक व साठवणूक संदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क बीड यांना कळविण्यात यावी असे आवाहन अधीक्षक नितीन घुले यांनी केले आहे.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);