prajakt tanpure

महेबूबभाईच्या गावाला निधी कमी पडू देणार नाही -ना. प्राजक्त तनपुरे

न्यूज ऑफ द डे शिरूर

शिरूर, दि. 14 : शिरूरचे भुमिपूत्र तथा आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिरूर नगर पंचायतचे सर्व उमेदवारांना विजयी करा. या शहराच्या विकासासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे अवाहन नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

मंगळवारी शिरूर नगर पंचायतीसाठी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी ना.प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, आ.बाळासाहेब आजबे यांनी जाहीर सभा घेतली. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, शिरूर नगर पंचायतकडून दोन महिन्याला गढूळ पाणी येत आहे. आतापर्यंत येथील सत्ताधार्‍यांनी नेमका काय विकास केलाय? चांगल्या प्रामाणिक माणसाच्या हातात सत्ता द्या पुढच्या एक वर्षात शिरूरचा कायापालट करून दाखवतो. नगरोत्थानमधून शिरूर शहरातील रस्त्यांसाठी 25 कोटी रूपये देण्यात येतील, असेही तनपुरे म्हणाले.
आ.निलेश लंके म्हणाले, आष्टी येथे घोटाळ्याचं मुख्य केंद्र आहे. तर शिरूर हे उपकेंद्र आहे. ही ओळख पुसण्यासाठी शिरूरकरांनी तरूण नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन केले.
या निवडणुकीत महेबूब शेख यांनी 17 पैकी 12 उमेदवार हे तरूण चेहरे दिले असून त्यांनीही सत्ताधार्‍यांवर येथेच्छा आरोप करीत प्रश्नांची सरबत्ती केली. या सभेला शिरूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

देवस्थानच्या जमीनी लुटणारांना थारा देऊन नका- महेबूब शेख
शिरूर नगर पंचायतसाठी सत्ताधारी मंडळीनी काहीच काम केलेलं नाही. केवळ या पंचायतीला त्यांनी भ्रष्टाचाराचं कुरण करून ठेवले आहे. ज्यांना देवस्थानच्या जमीनी पुरत नाहीत ते तुम्हा आम्हाला कसं सुरक्षीत ठेवणार? असा सवाल राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केला.

Tagged