uddhav

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रीमंडळाची तातडीची बैठक

By Karyarambh Team

June 09, 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरातील वाढता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा महिविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बौठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह महाआघाडीमधील मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिकमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात येत आहे.

हे असू शकतात बैठकीतील चर्चैचे विषयखरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका. बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा.राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पिककर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत निर्देश पोहचवा.शेतकऱ्यांना पिककर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.