corona pecaint suicide

खासगी सावकारकीला कंटाळून वडीलापाठोपाठ मुलाची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील घटना
मोठेवाडी दि.17 ः खासगी सावकारकीने त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) सकाळी 6 वाजता तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. वर्षभरापूर्वी सदरील युवकाच्या वडीलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. दरम्यान सदरील घटनेने खाजगी सावकारकीने राजेवाडी येथे दोन बळी घेतल्याची चर्चा आहे.

ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद (वय 33) या तरुणाकडे असणार्‍या तीन एक्करवर शेतीवर खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळते. सदरील कर्जापोटी हा युवक अनेक दिवसापासून त्रस्त होता. परंतु बँकेचे कर्ज शेतातील नापिकीमुळे फिटत नव्हते. शुक्रवारी सकाळी सदरील युवकाने विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली. खाजगी सावकारांचा तगादा वाढत असल्याने युवकाने आत्महत्या केली. तीन दिवसापूर्वी सदरील युवकाच्या वडीलाचा वर्ष श्राद्धचा कार्यक्रम झाला होता. वडीलापाठोपाठ युवकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. मयताचा चुलत भाऊ दीपक श्रीरंग महागोविंद यांच्या माहिती वरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजून बातम्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

11 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती होती.


पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

Tagged