Site icon कार्यारंभ लाईव्ह

परळीत मटका बुकीवर छापा; 114 जणांवर गुन्हा

parali mataka booki

parali mataka booki

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(6);

आयपीएस पंकज कुमावत यांच्या कारवाईने खळबळecho adrotate_group(8);

परळी : सहायक पोलीस अधीक्षक असलेल्या आयपीएस पंकज कुमावत यांच्या कारवायांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर आता परळीत गुरुवारी (दि.30) रात्री धडाकेबाज कारवाई केली. शहरातील एका मटका बुकीवर छापा मारला असून परळी शहर ठाण्यात 114 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्वतः सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पथकासह परळी शहरातील हनुमान नगर भागात गेले. त्याठिकाणी शिवाजी जाधव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी सुरु असलेल्या मटका बुकीवर छापा मारला. यात विलास पावडे, सुरेश तरडे, बालासाहेब मुंडे, संतोष साळुंके, राम बदने, प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यांच्यासह 20 जणांना ताब्यात घेतले. यावेळी सर्व आरोपी हे जुगाराचा अड्डा तयार करून कल्याण मटका, मधूर नाईट व मधूर डे जुगाराचे आकडे मोबाईलवर घेऊन जुगाराच्या पट्ट्या निवडत असल्याचे निदर्शनास आले. आरोपींसह रोख रक्कमेसह कल्याण मटका, मधूर डे, मधूर नाईट मटका जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण 1 लाख 13 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीचे मोबाईलवर आकडे देणार्‍या इसमांची माहिती घेऊन नावे निष्पन्न करून एजंट बुक्की मालक असे एकूण एकूण 114 जणांविरुद्ध परळी शहर ठाण्यात कलम 4, 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोउपनि.दादासाहेब शिंदे, पोहेकॉ.बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, रामहरी भांडणे, विकास चोपडे, राजू वंजारे, युवराज भूंबे यांनी केली. या धडाकेबाज कारवाई परळीसह जिल्ह्यातील अवैध धंदे वर्तुळात खळबळ उडाली आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);

Exit mobile version