अंबाजोगाई

बस -ट्रकच्या भीषण अपघातात सहा ठार

By Shubham Khade

January 09, 2022

अंबाजोगाईजवळील घटना; दहाजण जखमी

अंबाजोगाई : अंबाजोगाई -लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि.९) सकाळी ८.३० वाजता लातूर – औरंगाबाद बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात सहा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर बर्दापूर तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती आहे.

बातमी अपडेट होत आहे; रिफ्रेश करा.