Site icon कार्यारंभ लाईव्ह

अरे देवाऽऽ एकच शिक्षका 25 शाळांमधून उचलत होती वेतन

teacher

अरे देवाऽऽ एकच शिक्षका 25 शाळांमधून उचलत होती वेतन
13 महिन्यात 1 कोटी रुपयांचा घपला
बीड  : एकच शिक्षका पण तिने वेगवेगळ्या 25 शाळांमधून वेतन उचलल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या शिक्षकेने 13 महिन्यात तब्बल 1 कोटी रुपये अशा प्रकारे उचलून शासनाला चूना लावला आहे. हा प्रकार शिक्षकांचा डाटाबेस तयार करीत असताना उघडकीस आला.

अनामिका शुक्ला असे या शिक्षीकेचे नाव आहे. ही शिक्षिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान विषय शिकवते. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, आंबेडकरनगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग सापडली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यांना दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कस्तुरबा गांधी शाळा आहे. त्यामुळे अशाप्रकारे आणखी काहीजण फसवणूक करत नाहीत ना? याचीही चौकशी केली जात आहे.  हे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

Exit mobile version