क्राईम

एमपीएससीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

By Shubham Khade

January 15, 2022

echo adrotate_group(3);

नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊलं

पुणे : काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या उमेदवाराने आत्महत्या केली होती. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच आता पुण्यात सदाशिव पेठेत राहून एमपीएससीचा अभ्यास करणार्‍या एका विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची घटना घडली.echo adrotate_group(7);

अमर मोहिते असं या विद्यार्थ्यांच नाव आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अचानक आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. तो पुण्यात अभ्यास कारण्यासाठी आला होता. राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच चझडउ ची तो तयारी करत होता. मागील दोन वर्षांपासून तो झडख ची तयारी कारत होता. दुर्दैवं म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासूनच अमर नैराश्यात होता अशी माहिती समोर आली आहे. तो मित्रांना भेटला, त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच त्याने रूमवर आत्महत्या केली अशी माहिती समोर येतेय. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यात परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे आणि नियुक्ती न मिळेल यावरून अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. यातच मागील वर्षी स्वप्नील लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं करण्यात आली होती. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा चांगलाच तापला होता. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं अनेक होतकरू विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. मराठा आरक्षण अचानक रद्द झालं आणि अनेक विद्यार्थ्यांना भरतीला मुकावं लागलं होतं. अमर मोहिते या विद्यार्थ्यांचंही सिलेक्शन झालं होतं. मात्र मराठी आरक्षण रद्द झालं आणि अमरला फीझीकलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);