क्राईम

पत्नीने केला अपमान; पतीने घेतला गळफास!

By Keshav Kadam

January 16, 2022

माजलगाव दि.16 : पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.15) सकाळी 12 वा. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावातील साठे नगर येथे घडली.

अनिल उत्तम थोरात या ऊसतोड कामगाराने राहत्या घरात साडीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी अपमान केल्याने आणि दाखल केलेली केस मागे न घेतल्याने व्यथित झालेमुळे अनिलने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अनिलची आई महानंदा उत्तम थोरात यांच्या फिर्यादीवरून पत्नी छाया, तिचा मामा विजू आत्माराम क्षीरसागर, चुलता भाऊ राहुल क्षीरसागर आणि सासू संगीता अंकुश भिसे या चौघांवर माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.