क्राईम

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!

By Keshav Kadam

January 19, 2022

बीड दि.19 : तालुक्यातील नामलगाव फाटा येथे 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली.

शरद आनंदराव काशीद (वय 25 रा.कुमशी ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मागील काही महिन्यापासून शरद हा औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेला होता. काल, परवा तो काही कामानिमित्त गावी आला होता. त्यानंतर नामलगाव फाटा येथे बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे घोडके, शिंदे यांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.