galfas sucide, atmahatya, fashi,

सावकाराच्या जाचास कंटाळून कंत्राटी कर्मचार्‍याची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

सावकारावर सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल

सिरसाळा दि.20 ः खासगी सावकाराच्या सततच्या जाचास कंटाळून एका कंत्राटी कर्मचार्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.19) पहाटेच्यासुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघराज सर्जेराव गिरी (38 रा.माळी चिंचोली ता.केज.ह. मु. सिरसाळा) असे मयताचे नाव आहे.

मेघराज हे दुरसंचार विभागात कंत्राटी कर्मचारी होते. त्यांची पत्नी पुजा गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे नातेवाईक प्रकाश भारती त्यांच्या पत्नी जयश्री, यांच्या घरी व परळी येथील मारुती हाडबे यांच्या यांच्याकडून घेतलेल्या पैशाचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु गेल्या काही दिवसापासून मेघराज हे आर्थिक तणावात होते. त्यातच काही दिवसांपूर्वी मारोती हाडबे यांच्याकडून व्याजाने एक लाख 50 हजार रुपये घेतले होते. व्याज वीस हजार रुपये झाले होते. त्यांनी पैशाचा तगादा लावला होता, या त्रासास कंटाळून पतीने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सिरसाळा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे पाठवला आहे. याप्रकरणी आत्महत्यास प्रवृत्तकेल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 306, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक एकशिंगे करत आहेत.

Tagged