केज

बीड जिल्ह्यातील पाच न.पं.च्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर

By Shubham Khade

January 27, 2022

नगरविकास मंत्रालयाची माहिती

बीड : राज्यात नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर होणार होते. या अनुषंगाने नगरविकास मंत्रालयाने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जिल्ह्यातील ५ नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या तीनही नगरपंचायतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी, केज हे अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर वडवणीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे आता फेब्रुवारीत नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे.