Site icon कार्यारंभ लाईव्ह

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात

टाकळी फाटा येथील घटना

केज : केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात झाला असून सुदैवाने यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. केज -बीड रोडवरील टाकळी फाट्यावर आज (दि.५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली असून गाडीचे नुकसान झाले आहे. परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. घटनास्थळावरील व्यक्तींनी पृथ्वीराज साठे यांच्यासह इतरांना बाहेर काढून तत्काळ दवाखान्यात पाठवून दिले.

Exit mobile version