atul rakh

क्राईम

‘वडझरी पॅटर्न’चा आणखी एक म्होरक्या अटकेत

By Balaji Margude

February 09, 2022

echo adrotate_group(3);

बीड, दि.9 : राज्यभर गाजत असलेलं आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या आज पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा अटकेतील आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे.पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करीत होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून पुणे सायबर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. आज त्याला पुण्यातुनच पोलीसांनी जेरबंद केले. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. यातील केवळ संजय शाहुराव सानप हा पोलीसांनी जेरबंद केलेला आहे. आज अतुल याची अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. अतुल राख याला ताब्यात घेण्याची कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे सायबरच्या पोलीस उपायुक्त भाग्यरी नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, पोकॉ. शिरीष गावडे, पोकॉ.पुंडलिक, पोकॉ मांढरे, पोकॉ. कराळे यांनी केली. echo adrotate_group(7);

पेपर फुटीत अटक झालेले बीड जिल्ह्यातील आतापर्यंतचे आरोपीउध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 36 रा. तिंतरवणी. ता.शिरूर व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक बीड), मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग लातुरचा प्रशांत व्यंकट बडगीरे (वय 50 रा. योगेश्वरी नगरी अंबाजोगाई), मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा.एकात्मता कॉलनी यशवंतराव चौक अंबाजोगाई), नेकनूर स्त्री रुग्णालयाचा शाम महादू मस्के (रा.पंचशील नगर अंबाजोगाई), भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र पांडुरंग सानप (रा.भक्ती कंस्ट्रक्शन शामनगर बीड, मुळ गाव वडझरी ता.पाटोदा), नामदेव विक्रम करांडे (वय 33 रो हाऊस नं.3, अष्ट विनायक कॉलनी कॅनॉल रोड गयानगर बीड), संजय शाहुराव सानप (रा. वडझरी), विजय नागरगोजे, आयएएस सुशील खोडवेकर (रा.खोडवा ता.परळी) आणि आता अतुल राख (थेरला, ह.मु. अंकुशनगर बीड) यांना आतापर्यंत अटक झालेली आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);