करिअरबद्दलच्या तत्परतेचे कौतूक
अंबाजोगाई : शहरातील एका मंगलकार्यालयात उच्च शिक्षण घेत असलेल्या नववधूने लग्नमंडपातच गुरुवारी (दि.१७) परीक्षा दिली. तिने करिअरबद्दल दाखवलेल्या तत्परतेचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.
स्वरूपता तुकाराम काळे (रा.सनगाव, ह.मु.अंबाजोगाई) असे त्या नववधूने नाव आहे. स्वरूपताचा विवाह परभणी येथील वैभव विष्णू सोमवंशी यांच्याशी अंबाजोगाई येथील एका मंगलकार्यात दुपारी एक वाजता झाला. तिने मंगलाष्टके होऊन वरमाला घातली आणि नंतरचे सर्व पारंपरिक सोपस्कार परीक्षा संपेपर्यंत बाजूला सारून एमबीएच्या द्वितीय वर्षातील नियोजित विषयाचा पेपर ऑनलाइन पद्धतीने सोडवला. स्वरूपाताने करिअरबद्दल दाखवलेल्या तत्परतेचं कौतूक होत आहे.