न्यूज ऑफ द डे

नगरपालिका प्रभाग रचना ‘या’ तारखेला

By Shubham Khade

February 22, 2022

निवडणूक आयोगाचे आदेश

बीड : नगरपालिका निवडणूकिच्या तयारिने आता वेग घेतला असून राज्यातील नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

त्यानुसार आता १० मार्च रोजी प्रारुप तर १ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणूक आता एप्रिल नंतर होणे अपेक्षित आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रभागरचनेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे २ मार्चला पाठवायचा असून त्याची प्रसिद्धी १० मार्च रोजी करावयाची आहे. त्यावर हरकती मागवून १ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.