death

गृह रक्षक दलाच्या जवानाचा मृतदेह सापडला

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

केज तालुक्यातील घटना

केज : तालुक्यातील धनेगाव येथे ऊसाच्या शेतात युसुफवडगाव येथील गृह रक्षक दलाच्या जवानाचा मृतदेह बुधवारी (दि.23) सकाळी सापडला आहे.

 भरत निकम (रा. युसूफवडगाव ता. केज) असे मयताचे नाव आहे. ते दि.19 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिसात नोंद केली होती. पोलिसांनी मेसाई देवी मंदिराच्या परिसरातून ऊसाच्या शेतातून मृतदेह ताब्यात घेतला. युसूफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती सपोनि. संदीप दहीफळे यांनी दिली आहे.

Tagged