तीन घटनांनी माजलगाव तालुक्यात खळबळ
माजलगाव : गेल्या २४ तासांत शिक्षक, तरुणासह एका इसमाने आत्महत्या केल्याच्या घटना घडला. या तिन्ही घटना माजलगाव तालुक्यातील असल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पहिली घटना, शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे सुरेश रामकिसन बडे (वय ३७, रा.गावंदरा ता.धारूर) येथील शिक्षक राहत होते. त्यांनी नैराश्यातून गुरुवारी पहाटे ३ वाजता घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली. त्यांच्या खबरीवरून माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
दुसरी घटना, राजेवाडी येथे कृष्णा बालासाहेब कोके (वय १९) या युवकाने अज्ञात कारणावरून बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद झाली आहे.
तिसरी घटना, राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय ४०) या व्यक्तीने व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.