मनोरंजन

दिपीका पदुकोन असा घालवते तिचा लॉकडाऊन मधील वेळ…

By Karyarambh Team

June 10, 2020

माणुस जसा अन्न पाण्यावाचून राहू शकत नाही तसाच तो मनोरंजनाशिवाय राहू शकत नाही. आपल्या मनोरंजनासाठी कलाकार कायम सज्ज असतात मात्र ते त्यांचं मनोरंजन या लॉकडाऊन च्या काळात ते कसं करत असतील याचा विचार आपण करत नाहीत. आज आपण जाणुन घेणार आहोत दिपीका पदुकोनच्या लॉकडाऊन बद्दल.

लॉकडाउनच्या आधीपासूनच, दीपिकाकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भली मोठी यादी होती, जे तिला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी पाहायचेच होते. मात्र आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमात ते मागे पडत होते. या लॉकडाऊनमुळे तिला ही आयतीच संधी चालून आलेली असून लॉकडाऊनमधला आपल्या दिवसातला बराचसा वेळ या कामासाठी राखून ठेवला आहे.

या वेळात ती न चुकता नावाजलेले इंग्रजी तसेच गाजलेले हॉलीवूडचे चित्रपट तसेच काही वेबसीरीज बघून आपला वेळ घालवते आहे.एवढेच करून दीपिका थांबलेली नाही तर, तिने सोशल मीडियावर देखील आपण बघत असलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींची यादी आपल्या चाहत्यांना शेअर केली आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक हाइलाइट आहे ज्यात तिने सुचवलेल्या कलाकृतींची यादी आहे. ती चाहत्यांमध्ये ’डीपी के सुझाव’ म्हणून प्रसिद्ध आहे.