केज

टेम्पो-पिकअपच्या अपघातात चालक जागीच ठार; एक गंभीर

By Shubham Khade

February 24, 2022

echo adrotate_group(3);

कुंबेफळजवळील घटनाecho adrotate_group(7);

केज : भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि पिकअपच्या समोरासमोरील धडकेत टेम्पो चालक जागीच ठार झाला. तर पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच, पिकअपमधील एक बैल देखील जागीच ठार झाला. हा भीषण अपघात घटना केज- अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळजवळ आज (दि.24) सायंकाळी 7 वाजता घडला.echo adrotate_group(5);

  शेख कलीम शेख खलील (रा.बीड) असे मयत वाहन चालकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी असलेल्या पिकअप चालकाची ओळख पटली नव्हती. कुंबेफळजवळ भरधाव वेगात असेल्या आयशर टेम्पो (क्र.एम.एच. 46- एफ 5205) आणि पिकअपची (क्र.एम.एच.43 बी.बी. 1078) समोरासमोर जोरदार धडक झाली. घटनास्थाळावरून टेम्पो चालकाचा मृतदेह आणि गंभीर पिकअप चालकास रूग्णवाहिकेने केज उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यावेळी स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.echo adrotate_group(9);

एक बैल जागीच ठार, तर एक जखमीपिकअपमध्ये अडकलेले बैल स्थानिकांच्या मदतीने काढण्यात आले आहेत. सदरील पिकअप हा जनावरांच्या व्यापार्‍याचा असल्याचे समजे. त्यात एकूण चार बैल होते. त्यापैकी एक बैल जागीच ठार झाला. एक गंभीर जखमी तर उर्वरीत दोन किरकोळ जखमी आहेत. यातील एक बैल घटनास्थळावरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. echo adrotate_group(1);