पोलीस घटनास्थळी दाखल
परळी : शहराजवळील धारावती तांडा येथे वीर धाब्यासमोर आज (दि.27) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरापासनू जवळच असलेल्या धारावती तांडा येथे रोडलगच्या एका शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वास सुटल्याने हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्याचे समजते. माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला जात आहे. घटनास्थळी सपोनि.मारुती मुंडे, सपोनि.आण्णासाहेब खोडेवाड, पोउपनि. झांबरे, डीएसबीचे पोकॉ.विष्णू घुगे, पो.कॉ.अनमवाल, हारगावकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
संशयास्पद मृत्यु असल्याने खळबळपरळी तालुक्यात गत तीन दिवसांत तिघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यानंतर आज आणखी एक संशयास्पद मृत्यूचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धारावती तांडा येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल. दरम्यान, परिसरातील हॉटेलवरील सीसीटिव्ही तपासण्यात येत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.