Site icon कार्यारंभ लाईव्ह

परळीत बोगस मतदारांचा सुळसुळाट; गुन्हे दाखल होण्याची शक्यता

echo adrotate_group(3);

निवडणूक आयोगाकडून चौकशी; दुबार, स्थलांतरित नावे

परळी : तालुक्यात ठिकठिकाणी बोगस मतदारांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. टोकवाडीच्या मतदार यादीत सुमारे 168 दुबार स्थलांतरित मतदारांची नावे आढळून आली असून निवडणूक आयोगाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत, अशा लोकांवर लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(7);

टोकवाडी ग्रा.पं. सदस्य तथा भाजपचे उपाध्यक्ष संजय मुंडे व त्यांच्या आठ सहकार्‍यांनी या बोगस मतदारांचा प्रकार निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला असून त्यासंबंधीचे सर्व आक्षेप व पुरावे त्यांनी सादर केले आहेत. मुंडे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका निवडणूक आयोगाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत, त्याची सुनावणी देखील सध्या चालू आहे. टोकवाडी येथील मतदार यादी भाग क्रमांक 77, 78 व 79 मधील सुमारे 168 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत यासाठी ग्रामसभेने 16 नोव्हेंबर 2021 एक ठराव संमत केला होता. हे सर्व मतदार असे आहेत की ज्यांची नांवे परळी शहरातील यादीत तसेच परभणी, पुणे, पाथरी, हिंगोली याठिकाणी देखील नोंदवली गेली आहेत, हे मतदार टोकवाडी गावात निवास करत नाहीत, ते स्थलांतरित आहेत. असे असले तरी इथल्या यादीत त्यांची नावे असल्याने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावाने सर्रास बोगस मतदान होत असते, त्यासाठी ही नावे काढून टाकावीत अशी तक्रार मुंडे व सहकार्‍यांनी केली होती. या तक्रारीची आयोगाने दखल घेतली असून याची सुनावणी सध्या होत आहे. दरम्यान, अशा दुबार व स्थलांतरित नावे असणार्‍या मतदारांवर लवकरच गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);

Exit mobile version