न्यूज ऑफ द डे

बीडचे अनिल जगताप शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख

By Shubham Khade

March 14, 2022

४ महिन्यांपासून रिक्त होते पद

बीड : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी अनिल जगताप यांची प्रभारी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती ही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आली आहे. केलेल्या कार्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सदर नियुक्ती कायम करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. दरम्यान, तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणात कारवाई झाली होती. त्यामुळे हे पद ४ महिन्यांपासून रिक्त होते.