जेष्ठ नागरिक पलिंकाबाई थोरात यांचे निधन

धारूर न्यूज ऑफ द डे

आज होणार अंत्यविधी

किल्लेधारूर : तालुक्यातील पांगरी येथील रहिवाशी जेष्ठ नागरीक पलिंकाबाई शहाजी थोरात यांचे सोमवारी (दि.२१) वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्ष होते.

मागील काही दिवसांपासून पलिंकाबाई ह्या आजारी होत्या. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर पांगरी येथील शेतात आज (दि.२२) सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावाई, नातवंडे, पत्रूंड असा मोठा परिवार आहे. दैनिक कार्यारंभ ते धारूर तालुका प्रतिनिधी सचिन थोरात यांच्या त्या आजी होत्या.

Tagged