अंबाजोगाई

योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई

By Shubham Khade

March 23, 2022

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची माहिती; आमदार संजय दौंड यांची लक्षवेधी सूचना

अंबाजोगाई : येथील योगेश्वरी देवस्थान जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यासंदर्भात विधानपरिषदेत आमदार संजय दौंड यांनी लक्षवेधी सूचना केली होती.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अंबाजोगाई येथील योगेश्वरी संस्थानची जमीन मालकी हक्क घोषित करण्याबाबत प्राप्त अर्ज मंजूर केल्यानंतर सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध सचिव योगेश्वरी यांनी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे अपील दाखल केले आहे. देवस्थान इनाम व वक्फ जमिनीसंदर्भात पारीत करण्यात आलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील इनामी जमीन गैरव्यवहाराचायेत्या 3 महिन्यात चौकशी अहवाल देणारबीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम वक्फ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत चौकशी करुन 3 महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी यांच्या अहवालाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.