accident

उभ्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

होळ येथील घटना

केज : उभ्या ट्रॉलीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केज -अंबाजोगाई मार्गावरील होळ शिवारात आज (दि.२७) सायंकाळी ८ वाजता घडली.

महादेव रामभाऊ सारूक (वय ६५, ह.मु.अंबाजोगाई, रा.सारूकवाडी ता.केज) असे मृत माजी सैनिकांचे नाव आहे. ते सारूकवाडी येथून पत्नी रिता सारूक (वय ५५) यांच्यासोबत दुचाकीवरून (एम.एच.४४ एल ९५६७) येत होते. होळजवळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. यात डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा.ईश्वर मुंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर महादेव सारूक यांना मृत घोषित केले आहे.

Tagged