अंबाजोगाई

आयपीएलवर सट्टेबाजी; चार सट्टेबाज पकडले

By Shubham Khade

March 30, 2022

अंबाजोगाई शहर पोलिसांची कारवाई

अंबाजोगाई : आयपीएलवर सट्टेबाजी तेजीत सुरू झाली असून शहरातील बलुत्याचा मळा येथील अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास छापा मारून आज चौघांना ताब्यात घेतले.

सतीश नागनाथ गंजेवार, दत्ता गोविंदराव साखरे, अनंत जगन्नाथ कदम (सर्व रा. अंबाजोगाई) आणि बालाजी पाटील (रा. लातूर) असे पडकण्यात आलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. ते चौघे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद या सामन्यावर मोबाईलवरून सट्टा खेळताना आणि खेळवत असताना आढळून आले, त्यांना ताब्यात घेऊन १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.