acb office beed

केज

बापरे! थकलेला पगार, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी 12 लाखांची मागणी!

By Keshav Kadam

April 02, 2022

echo adrotate_group(3);

दिड लाखांची लाच घेतांना संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यातबीड दि.2 : सेवानिवृत्त झाल्यानंतरही संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे, थकलेला पगार, केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्याकडे 12 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा प्रकार केज तालुक्यात घडला असून या प्रकरणी केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर शिंदे यांंनी बीड एसीबीचा पदभार घेतल्यापासून महिनाभरातच मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. त्यावरुन जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. echo adrotate_group(6);

echo adrotate_group(5);

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या विरुद्ध संस्थेच्यावतीने उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा चे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय, तांबवा मुख्याध्यापक अनंत बाबुराव हांगे, सानेगुरुजी विद्यालय, तांबवा अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड व मेडिकल मालक दत्तात्रय सुर्यभान धस यांनी 12 लाख रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने सापळा लावला असता आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली तसेच पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारताना पंचासमक्ष भगवान मेडिकल स्टोअर येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. echo adrotate_group(9);

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस, पोह.सत्यनारायण खेत्रे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, स्नेहलकुमार कोरडे, संतोष राठोड, अविनाश गवळी व चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. echo adrotate_group(1);