क्राईम

बीडचे एसपी आर. राजा यांची बदली!

By Keshav Kadam

April 20, 2022

बीड : दि.20 बीड जिल्ह्यातील कायदा-व्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज आर. राजा हे रजेवर होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

येथील रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण, तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे, अवैध वाळू उत्खनन यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच बीडचा बिहार झाल्याच्याही प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर राजांना रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज बुधवारी (दि.20)पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून राजा रमास्वामी यांना नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.