Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड आरटीओ कार्यालयातील पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

crime
echo adrotate_group(3);

echo adrotate_group(7);

बीड दि.22 : अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
echo adrotate_group(8);

echo adrotate_group(9);

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण करणे, वाहनावरील बोजा उतरवणे इत्यादी कामासाठी कार्यालयीन अधिकाऱ्यांची तसेच शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या फिर्यादीवरून गुफरान बेग, सय्यद इरफान, दिगंबर गायकवाड, बाबा काजी, शहाजान खान (सर्व रा.बीड) यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली असून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू असून पैशासाठी खोटी कामे केली जात असल्याचे दिसून येत आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. echo adrotate_group(10);

Exit mobile version