लॉकडाऊननंतर उघडलं तिरुपती मंदिर, पहिल्याच दिवशी भाविकांनी दिलं “इतकं” दान

देश विदेश

दि.11ः तिरुपतीः तामिळनाडुतील तिरुमला तिरुपती मंदिर लॉकडाऊननंतर सोमवारी पहिल्यांदा उघडण्यात आलं. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मंदिर उघडण्यात आलं.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला मंदिरात देवाच्या दर्शनासाठी तिकिटांच्या बूकिंगसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, मंदिर उघडल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत दहा हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती मंदिरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर दान केले जाते. या मंदिरात एका महिन्याला जवळपास 200 कोटींहून अधिक किंमतीचे दान मिळते. देशात लॉकडाऊन झाल्यानं मंदिरही बंद कऱण्यात आलं होतं. यामुळे गेल्या दोन महिन्यांत एकही रुपया दान मिळाले नव्हते.

आता पहिल्याच दिवशी 25 लाख 70 हजार रुपयांचे दान भाविकांनी केले आहे. मंदिर ट्रायल म्हणून उघडण्यात आलं असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता 11 तारखेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Tagged