खा.शरद पवार यांची बदनामी केल्याचा आरोप
अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी सिनेअभिनेत्री केतकी चितळेविरोधात अंबाजोगाईत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सिनेअभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर खासदार शरद पवार यांच्याबद्दल दि.१३ मे रोजी बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. ज्यात संत तुकाराम यांचा देखील उल्लेख करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या फिर्यादीवरून केतकी चितळेविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी आणखी वाढ झाली आहे.