बीड

बीडमधील ‘हा’ भाग कंटेनमेंट झोन

By Karyarambh Team

June 12, 2020

बीड : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांचा शहरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा संशय आरोग्य विभागास होता. त्यानुसार कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यात आलेले आहेत. याशिवाय रुग्ण आढळलेला भाग जिल्हाधिकार्‍यांनी कंटनमेंट झोन घोषित केला आहे.

   जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारीचे कलम 144 नुसार बीड शहरातील गुलाब मुबशीर अहमद यांच्या घरापासून पासून ते हिना पेट्रोल पंपा पर्यंतचा परसिर कंटनेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत आहे.