क्राईम

टेम्पोखाली चिरडून चिमुकलीचा मृत्यू!

By Keshav Kadam

May 30, 2022

पुरुषोत्तमपुरी येथील घटनामाजलगाव दि.30 ः गॅस टाक्याने भरलेला टेम्पो पाठीमागे घेताना टायरखाली आल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुरुषोत्तम पुरी येथे सोमवारी (दि.30) दुपारच्या सुमारास घडली.

योगायोग गॅस एजन्सी माजलगाव येथून गॅस टाक्या घरपोच करणारा टेम्पो पुरुषोत्तम पुरी येथे आला होता. त्या टेम्पोतून गॅस टाक्या खाली केल्यानंतर टेम्पो पाठीमागे घेत असताना टेम्पोच्या (एमएच-44 यू-1166) पाठीमागे किराणा दुकानावर जात असलेली राजवी शिवाजी आळणे (वय दीड वर्षे) ही मुलगी टेम्पो चालकाला दिसली नाही. टेम्पोच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.