महाराष्ट्र

..तर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कापणार

By Karyarambh Team

June 05, 2020

मुंबई : सरकारी कर्मचार्‍यांनी आठवड्याभरात कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांना पगारकपातीला सामोरं जावं लागेल असं ठाकरे सरकारने म्हटलं आहे.

पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. सरकारी कर्मचार्‍यांनी आठवड्यातून एकदा कामावर रुजू व्हावं असे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. 8 जूनपासून सरकारी कार्यालयं सुरु होणार आहेत. अशात आठवड्याभरातून एकदा कार्यालयात हजेरी लावा अन्यथा पगार कपात होईल असं त्यांनी या आदेशात म्हटलं आहे.