न्यूज ऑफ द डे

देवेंद्र फडणवीस रातोरात दिल्लीत दाखल; संजय राऊत म्हणाले

By Keshav Kadam

June 21, 2022

बीड, दि.21: या सगळ्या प्रकरणानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भुमिका स्पष्ट केले. पण तत्पुर्वी आता देवेंद्र फडणवीस हे रातोरात दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. पक्षाच्या वरीष्टांच्या त्यांच्या बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवार हे देखील दिल्लीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.काय म्हणाले संजय राऊत

काही ठळक घडामोडी

– शिवसेनेच्या दुपारी होणार्‍या बैठकीमध्ये आपण मुंबईत हजर राहू अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी थोडड्याच वेळापुर्वी स्पष्ट केले आहे. मी इतर कोणाच्याही संपर्कात नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस राष्ट्रवादीसोबत असलेलं सरकार आम्हाला मान्य नसल्याची थेट भुमीका एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांनी घेतली आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेसोबतच राहू, अडीच वर्षांचा घरोबा आता पूर्ण झालाय. त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नको, अशी आमदारांनी भुमिका घेतल्याची माहिती आहे. आतापर्यंत 19 आमदार आयडेटीफाय झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार येणार अशी मोठी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शिवसेनेतील या आमदारांचा रोष शिवसेना पक्ष प्रमुखांवर देखील आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ग्रामीण भागातील आमदारांना वेळ देत नाहीत. ते केवळ महानगरातील आमदारांशी संपर्कात असतात, त्यामुळे शिवसेनेत मोठं बंड होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

शवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात बंड केल्यानंतर आता त्यांच्यासोबत मराठवाड्यातील सहा आमदार आणि दोन मंत्री असल्याची माहिती मिळत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जालन्याने अर्जुन खोतकर हे सुध्दा असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांना आमच्याकडे या अशा आशयाचे निरोप मिळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेची वाताहत होण्याची शक्यता आहे.