संजय राऊत यांच्या ट्विटने राजकारणात मोठी खळबळ
बीड, दि.22: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक ट्विट केले आहे. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे झाले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असेही आता बोलले जात आहे.शिवसेनेकडून परिस्थिती पुर्णपणे हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. याशिवाय काही अपक्ष देखील शिंदेंसोबत आहेत. तर काही अपक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यामुळे भाजपा नेमका काय करेल यावर विधानसभा बरखास्तीबाबत स्पष्ट होऊ शकेल.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत आहे का याबाबत विचारपूस करू शकतील. भाजपचे नेमकं काय सुरु आहे याबाबत आताच काही स्पष्टपणे सांगितले जात नाही. परंतु मध्यावधी घेतल्या तर भाजपला सध्या पोषक वातावरण आहे, असे भाजपला वाटत आहे. मध्यावधीनंतर आपण पुर्ण बहुमताने सत्तेवर येऊ, असा भाजपला विश्वास आहे.
एकनाथ शिंदेंच्या भुमिकेकडेही लक्षएकनाथ शिंदे यांनी अजुनही स्पष्टपणे सत्ताकारण सांगितलेले नाही. त्यांनी केवळ महाविकास आघाडीबरोबर नको, अशी भुमिका घेतलेली आहे. आपण भाजपकडे संपर्क केलेला नाही असेही ते वारंवार स्पष्ट करून आपण शिवसेना सोडणार नाहीत, असेही सांगत आहेत. त्यामुळे शिंदेंचा स्वतंत्र गट स्थापन करून त्यांच्या पाठींब्यावर सरकार स्थापन करू, असाही एक मतप्रवाह भाजपात आहे. तर दुसरीकडे या सगळ्या आमदारांना राजीनामे द्यायला लावून त्यांना पुन्हा निवडणूक लढवायला लावणे, असेही काही पर्याय भाजपकडून चाचपून पाहण्यात येत आहे.
शरद पवारांच्या बैठकीकडे लक्षदरम्यान शरद पवार यांनी आपल्या आमदारांसोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर शरद पवार महाराष्ट्रातील सत्ताकारणावर काय निर्णय घेतात हे देखील पहावं लागणार आहे.