न्यूज ऑफ द डे

आ.नितीन देशमुख शिंदेंच्या गोटातून वर्षावर परतले तर मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीकडे रवाना

By Balaji Margude

June 22, 2022

echo adrotate_group(3);

बीड, दि.22: अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख आता परत आले आहेत. त्यांना चुकीचे बोलून बसमध्ये बसवले. मात्र काहीतरी गडबड होतेय हे लक्षात येताच नितीन देशमुख हे शिंदे यांच्या ताफ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरात पोलीसांनी त्यांना पकडून मारहाण करीत विनाकारण अनेक हॉस्पिटलमध्ये फिरवत चुकिच्या पध्दतीने माझ्यावर उपचार केले. मला कसलाही हृदविकाराचा धक्का बसला नव्हता. किंवा माझा साधा बीपी देखील वाढलेला नव्हता, असेही आ.नितीन देशमुख यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. बाळापुरच्या सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात त्यांनी मिसिंगची ही तक्रार दाखल केली होती. आता देशमुख लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मी उध्दव साहेबांचा शिवसैनिक असून मी उध्दव साहेबांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कालच आ.नितीन देशमुख यांची एका कागदावर सही घेण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमके किती आमदार याची फिक्स काऊंटींग अजून व्हायची आहे. त्यांनी आपल्याकडे शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे.echo adrotate_group(7);

याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नितीन देशमुख यांना आम्ही पळवून आणले असते तर त्यांना आमच्याच माणसांनी परत सोडले नसते. तर आता आमच्याकडे 46 आमदार असून आणखीही आकडा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.echo adrotate_group(8);

गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीकडे रवानामंत्री गुलाबराव पाटील हे देखील आता गुवाहाटीकडे रवाना झालेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची संख्या वाढताना दिसत आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);