SANJAY RAUT

बीड

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स

By Shubham Khade

June 27, 2022

कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे.

उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान उद्या संजय राऊत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे ते उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ते ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.