ajit pawar

बीड

उपमुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

By Shubham Khade

June 27, 2022

स्वतः ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. दरम्यान, अजित पवार यांची प्रकृती स्थिर आहे.