uddhav

आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन होणार बंद

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा निर्णय मुंबई: कोरोनाने आधीच सर्वजण हैराण असताना, महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. 1975 ते 1977 दरम्यान आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन आता बंद होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : गुरुवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

बीड, दि.30 : बीड जिल्ह्याची कोरोना एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून आजही 37 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 738 इतकी झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढील प्रमाणे बीड जिल्हा कोरोना अपडेट गुरुवार दि. 30 जुलै एकूण रुग्ण – 738मृत्यू झालेले रुग्ण – 29डिस्चार्ज- 313उपचार- 396 जुलै महिन्यात असे आढळले आहेत […]

Continue Reading
two wheeler ride

दुचाकीवर डबल सीटला मंजुरी

बीड, दि.30 : राज्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही हाच कालावधी लागू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नव्या आदेशानुसार आता दुचाकीवर दोघां जणांना हेल्मेट आणि मास्क सह प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय तीनचाकी आणि चारचाकीतही प्रवाशी संख्या वाढविण्यात आली आहे.काय म्हटले आहे […]

Continue Reading
atyachar

अमरावतीत विकृती : चक्क तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

अमरावती, दि.30 : तळपायाची आग मस्तकाला जाईल, असा संतापजनक प्रकार अमरावतीत घडला. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तरुणीला पुन्हा एकदा स्वॅब देण्यास बोलावून घेतले. आणि चक्क तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे खळबळजनक कृत्य लॅब टेक्निशियनने केले. संबंधीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पेश […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा : कोरानाची घौडदोड कायम, आजही 58 पॉझिटिव्ह

बीड, दि.29 : बीड जिल्ह्यातील कोरोनाची सुरु असलेली घौडदोड कायम आहे. बुधवारीही तब्बल 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 701 इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंदबीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात […]

Continue Reading
GEVRAI

गेवराई शहर पुढील आठदिवसासाठी बंद

बीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेतगेवराई शहरात दररोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदबाबतचे यापुर्वीचे सर्व नियमही गेवराई शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.

Continue Reading

खून प्रकरणातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपी फरार

बीड : खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी (दि.29) हा आरोपी फरार झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.केज तालुक्यातील दहिफळ ववडमाऊली येथील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून आरोपीस अटक […]

Continue Reading