कंटेनरची दुचाकीस धडक, एकाचा मृत्यू

माजलगाव :  भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात तेलगाव ते दिंद्रुड परिसरातील भोपा जिनिंगसमोर गुरुवारी (दि.27) सायंकाळच्या सुमारास घडला.       सत्यभान गंगाधर गवळी (वय 32 रा.भोपा) असे मयताचे नाव आहे. दुचाकीवरुन (एमएच-44 जे.9486) जात असताना भरधाव आलेल्या कंटेनरने (डीएन-09 एस-9705) जोराची धडक दिली. यामध्ये सत्यभान हे कंटेनरच्या चाकाखाली […]

Continue Reading
majalgaon ek shahr ek ganpati

माजलगावकरांचा ऐतिहासिक निर्णय; शहरात केवळ एकच गणपती बसविणार!

सर्व गणेश मंडळाचा एकमताने निर्णयटेंबे गणेश मंडळाची होणार स्थापना माजलगाव : कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन होण्याकरीता माजलगावात सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमतने 121 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री ढुंढीराज टेेंबे गणेश मंडळाचीच स्थापना करायची, असा एकमताने ठराव घेतला. एक […]

Continue Reading
antigen test majalgaon

माजलगावचा आकडा वाढला

माजलगाव : माजलगाव शहरात सुरु झालेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 31 व्यापारी आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. 678 जणांच्या तपासणी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण आढळल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले.कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, सिद्धेश्वर विद्यालय, गणपती […]

Continue Reading
nidhan

माजी नगरसेवक मधुकरराव पानपट यांचे निधन

माजलगाव : शहरातील भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगरसेवक मधुकरराव बाबाराव पानपट (वय 72) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे 5 वाजता निधन झाले. भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून मधुकरराव पानपट यांची माजलगाव शहरासह परिसरात ओळख होती. अल्पशा आजाराने त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 11 वाजता मंगलनाथ स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या […]

Continue Reading
bindusara prakalp

बिंदुसरा प्रकल्प भरला! आता माजलगावची बारी

नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी केले जलपुजन बीड, दि.16 : बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प 99 टक्के भरला असून ते आता छोट्या चादरीवरून केव्हाही वाहण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बिंदुसरा भरल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा […]

Continue Reading
harsh

पात्रुड येथे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन

पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने केले होते नदी खोलीकरण माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथील नदी खोलीकरण करून सिंचन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून नदी खोलीकरण काम करण्यात आले होते. हि नदी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली असल्याने आज दि.१५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. माजलगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील म्हणून पात्रुडची ओळख १९९३ च्या […]

Continue Reading
JAYAKWADI, NATHSAGAR

बिंदुसरा 98 टक्के तर माजलगाव 68 टक्क्यांवर

बीड : जिल्ह्यातील माजलगाव धरण शनिवार (दि.15) रोजी 67.69 % इतका भरले असून पाली येथील बिंदुसरा धरण 98%भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे बीड शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरणाची पाणी पातळी 98 […]

Continue Reading
kirana dukan

लॉकडाऊन किराणा व्यापार्‍यांच्या आवडीचा

माजलगाव । महेश होके ग्राहकांची अव्वाच्या सव्वा दराने लूटकुठं फेडणार हे पाप? दि.11 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आज रात्री 12 पासून दहा दिवस लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. यामुळे सणा-सुदीच्या दिवसांचा विचार करून नागरिकांनी किराणा साहित्यांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली. परंतू या गर्दीचा फायदा उचलत व्यापार्‍यांनी ग्राहकाना सर्रास अव्वाच्या सव्वा दर लावून लूट केली. यामुळे […]

Continue Reading
sahal-chaus

माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती खालावली

बीड, दि.9 : माजलगावचे माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांची प्रकृती सध्या खालावली आहे. ते बीडच्या क्वारंटाईन जेलमध्ये असताना शनिवारी त्यांना मायनर अटॅक आला. त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याची माहिती चाऊस यांचे बंधू तालेब चाऊस यांनी दिली.4 मार्च रोजी त्यांना भ्रष्टाचाराच्या […]

Continue Reading