fire

परळीत गोळीबार !

परळी दि.29 : सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम अंतिम टप्प्यात आहे. तीन दिवसावर मतदान आलेले असताना परळीतील विद्यानगर परिसरात शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. येथील अरुण टाक यांचा मुलगा राहुल टाक याने दारूच्या नशेत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ […]

Continue Reading
acb office beed

1000 रुपयांसाठी भीकमागेपणा अभियंत्याला नडला, बीड एसीबीची कारवाई

बीड – गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंत्याने एका शेतकर्‍यांकडे गायगोठ्याची फाईल करण्यासाठी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आज त्या अभियंत्याच्या मुसक्या बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आवळल्या आहेत. विनायक राठोड असे मुसक्या आवळलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. हजारो रुपयांचा शासकीय पगार असताना भिकार्‍यासारखी 1000 रुपयांची लाचेची मागणी अभियंत्याला आता चांगलीच महागात पडली आहे.विनायक राठोड ह्याने […]

Continue Reading

अंबाजोगाईत मोदी विरुद्ध मुंदडा ‘थेट लढत’

अंबाजोगाई दि.17 : अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज वेग आला असून दोनही आघाड्यांच्या प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तर लोकविकास महाआघाडीच्यावतीने विद्यमान नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अर्ज दाखल केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून अंबाजोगाई नगर परिषदेवर […]

Continue Reading

बीडमध्ये चौरंगी लढत होणार, कोणीच कोणाला कमी नाही

बीड, : बीड नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम या प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपाने अनपेक्षीतपणे नवखा उच्च विद्याभुषित डॉ. ज्योती घुमरे यांना मैदानात उतरवल्यानं या लढतींमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. जे मुजीब शेख तुतारीकडून उमेदवारी मागत होते […]

Continue Reading

माजलगावात नगराध्यक्षपदासाठी पाचप्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांची एंट्री!

माजलगाव : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवशी प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करून अर्ज दाखल केले. यासोबतच अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करत स्पर्धेची दिशा अधिकच रोचक बनवली. माजलगाव शहरातील राजकीय हालचालींना आता वेग आला असून माजलगावमधील राजकीय तापमान चढू लागले आहे.भाजपकडून संध्या ज्ञानेश्वर मेंडके यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवारी अर्ज […]

Continue Reading

धारूर नगरपरिषदेसाठी भाजपाकडून रामचंद्र निर्मळ यांचाउमेदवारी अर्ज दाखल

किल्ले धारूर │ सचिन थोरात दि.17 : होऊ घातलेल्या धारूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी रामचंद्र अंबादास निर्मळ यांच्या नावाची अचानक दोन दिवसांपूर्वी चर्चा सुरू झाली होती. पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू माधव निर्मळ यांचे ज्येष्ठ बंधू असलेल्या रामचंद्र निर्मळ यांनी अखेर 17 नोव्हेंबर, सोमवार रोजी समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना भाजप […]

Continue Reading
acb trap

वाळू माफियाकडून 20 हजारांची लाच घेतांना हवालदार पकडला!

-बीड एसीबीच्या कारवाईने खळबळकेशव कदम दि.08 ः कुठलेही टेंडर नसताना खुलेआम अवैध वाळू उपसा केला जात आहे. याप्रकरणी सातत्याने बातम्या प्रकाशित केल्यानंतरही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वाळूमाफियाला दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी तब्बल 30 हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडअंती 20 हजाराची लाच स्विकारताना शनिवारी (दि.8) गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास […]

Continue Reading
MANOJ JARANGE

परळीतील बैठकीत ‘डील’ ठरली ; पंकजा मुंडे, धस, बावनकुळेबद्दल अनेक खुलासे!

मनोज जरांगे पाटलांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप मला जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या धनजंय मुंडेना ताब्यात घ्या केशव कदम – बीड दि.7 : अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी (दि.७) आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. या आरोपांनुसार, धनंजय मुंडे यांचे पीए कांचन यांनी काही व्यक्तींना घेऊन परळी येथे नेले असून, तिथे एका […]

Continue Reading

गेवराई, बीड ग्रामीण, शिवाजीनगर, पेठबीडच्या ठाणेप्रमुखांची खांदेपालट

बीड : जिल्हा पोलिस दलात अचानक मोठे फेरबदल करण्यात आले असून बीड शहरातील चार महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस वर्तुळात आणि स्थानिक राजकीय पातळीवर चर्चा रंगू लागली आहे. या अदलाबदलीत गेवराई, शिवाजीनगर, बीड ग्रामीण आणि पेठबीड या चार ठाण्यांचा समावेश आहे. गेवराई पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांना […]

Continue Reading

धुळे-सोलापूर महामार्गावर मिनीट्रॅव्हल्सवरील 12 बॅगा लंपास!

महामार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज मिळविले, तिघांचा शोध सुरु बीड दि.30 : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा ते पारगाव टोल नाका परिसरात गुरुवारी (दि. 30) सकाळी साडेआठच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली. एका मिनी ट्रॅव्हल्स (क्र. डी.डी. 01 ए.सी. 9540) गाडीवर ठेवलेल्या 12 बॅगा दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला फेकून लंपास केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading