फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटक

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटकबीड दि.15 : गुटख्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरु असताना ही फरार राहून बिनबोभाटपणे रॅकेट चालविणाऱ्या माफियाला जेरबंद करण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले. साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत औरंगाबाद, पुणे येथे फिरत होता. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पहाटे शहरातील गंगाधाम परिसरातील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.       […]

Continue Reading
NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading
balasaheb takat

आडत व्यापारी बालासाहेब माणिकराव ताकट यांचे दुःखद निधन

माजलगाव- तालुक्यातील रोशनपुरी येथील रहीवाशी आणि आडत व्यापारी बालासाहेब माणिकराव ताकट यांचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 60 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपुर्वी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. माजलगावात तब्येत खालावत चालल्यानंतर त्यांना औरंगाबादच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेली. मंगळवारी (दि.14 डिसेंबर) रात्री साडेनऊच्या […]

Continue Reading

विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या अतिथी हॉटेलवर छापा!

आयपीएस पंकज कुमावत व दारुबंदी विभागाचे अधीक्षक घुले यांची कारवाई बीड दि.14 : शहरातील अतिथी हॉटेल काही महिन्यापूर्वी सील केले होते. तरीही विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तरित्या छापा मारला. यावेळी 91 हजारांची […]

Continue Reading
prajakt tanpure

महेबूबभाईच्या गावाला निधी कमी पडू देणार नाही -ना. प्राजक्त तनपुरे

शिरूर, दि. 14 : शिरूरचे भुमिपूत्र तथा आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिरूर नगर पंचायतचे सर्व उमेदवारांना विजयी करा. या शहराच्या विकासासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे अवाहन नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. मंगळवारी शिरूर नगर पंचायतीसाठी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी ना.प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, आ.बाळासाहेब आजबे यांनी […]

Continue Reading

बीडमध्ये बससस्थानक परिसरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या!

बीड दि.14 : धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक बीड शहरातील बसस्थानक परिसरातील एचडीएफसी बँकेसमोर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने शहरत खळबळ उडाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 रा.खासबाग, बीड) असे […]

Continue Reading

शेतीच्या जुन्या वादातून तलवारीने प्राणघातक हल्ला!

बीड दि.14 : 15 वर्षापासून सुरु असलेल्या शेतीच्या वादातून एका शेतकर्‍यावर तलवारी सारख्या शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. आरोपींनी सर्व वार हे डोक्यात व चेहर्‍यावर केले आहेत. गंभीररित्या जखमी झालेल्या शेतकर्‍यास बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना धारुर तालुक्यातील तेलगाव कारखान्यासमोर मंगळवारी घडली आहे. संभाजी कारभारी वडचकर (वय […]

Continue Reading
NSL shugar factory

माजलगावात अतिरिक्त ऊस असताना दलाल पोसण्यासाठी पाथरीला टोळ्या

गिरीश लोखंडे हे पाप कशासाठी? माजलगावच्या शेतकर्‍यांनी फाशी घ्यायची का? बालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या कार्यक्षेत्रातच अतिरिक्त ऊस आहे. मात्र असे असताना कारखान्याकडून पाथरी तालुक्यात टोळ्या टाकल्या जातात. कारण एकच गेटकेन ऊसात अधिकारी, मुकादम यांना मोठं घबाड मिळतं. आणि गेटकेन ऊस का आणता असे कोणी विचारले तर प्रत्येक वर्षी तिकडचे शेतकरी आम्हाला […]

Continue Reading
wadwani nagar panchayat

बाप-लेक आणि काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला!

वडवणीत लक्षवेधी लढती : सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीकडून जबरदस्त व्युव्हरचना प्रतिनिधी । वडवणीदि. 13 : वडवणी नगर पंचायत राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या बाप-लेकांच्या हातून खेचण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके आणि सभापती जयसिंह सोळंके या काका पुतण्याने चांगलीच कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ.सोळंके चुलते-पुतणे वडवणीत ठाण मांडून होते. त्यांनी भाजपचा एक […]

Continue Reading

बीड ग्रामीण पोलिसांनी गुटखा पकडला!

टेम्पो, झायलो कारसह दोघे ताब्यातबीड : दि.14 : रात्र गस्तीवर असलेल्या बीड ग्रामीण पोलिसांनी नामलगाव फाटा परिसरात मंगळवारी (दि.14) पहाटेच्यासुमारास गुटखा पकडला. यावेळी टेम्पो, झायलो कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. बीड ग्रामीण पोलीस रात्र गस्तीवर असताना नामलगाव फाटा परिसरामध्ये टेम्पोत गुटखा असल्याचा संशय […]

Continue Reading