corona virus

बीड जिल्हा; 146 पाझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.9) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.9) 2813 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 146 जण बाधित आढळून आले. तर 2667 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 13, आष्टी 16, बीड 22, धारूर 13, […]

Continue Reading
corona

आज जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

बीड- बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. आज 3100 चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात 123 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांची यादी पुढील प्रमाणे….

Continue Reading

एवढ्या गर्दीत फिरणं बरं नव्हं…!

बीड दि.8 : कालपासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि खरेदीसाठी नागरिकांची सगळीकडे उडी पडली. असं कुठलेही दुकान नसेल तिथं गर्दी नव्हती. शहरातील सर्वच दुकाने खचाखच भरलेली दिसून आली; पण एवढ्या गर्दीत घुसणे हे जीवासाठी बरं नव्हे. कारण कोरोना अजुनही गेलेला नाही. फक्त बेड रिकामे झाल्यामुळे शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आजही काळजी घेणे गरजेचे […]

Continue Reading
beed devsthan jamin ghotala

देवस्थानच्या जमीन पचविण्याचा अधिकार्‍यांचा शेवटपर्यंत प्रयत्न!

प्रशासनाचा आघावपणा : संबंधीत आदेश बोगस पण तरीही अधिकारी फौजदारी का करीत नाहीत? बालाजी मारगुडे, बीड बीड, दि. 7 : जिल्ह्यात नोकरी करणार्‍या महसुलच्या अधिकार्‍यांनी देवांच्या जमीनी दुसर्‍यांच्या नावे करताना लाजाच सोडून दिल्याचे जिल्ह्याने पाहीले. या जमीनीचे प्रकरण उजेडात आल्यानंतरही ह्या जमीनी पचविण्यासाठी अधिकार्‍यांकडून शेवटपर्यंत प्रयत्न सुरुच आहेत. सामान्य प्रशासन (भूसुधार)चे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील […]

Continue Reading
corona

कोरोना बाधितांचा आकडा आणखी कमी!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी कमी होत आहे. सोमवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 155 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.7)दोन हजार 845 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 155 जण बाधित आढळून आले. तर 2 हजार 690 जण निगेटिव्ह आले आहेत. बीड-20 अंबाजोगाई 18, […]

Continue Reading

कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने पकडली

बीड दि.7 : कत्तलखान्याकडे गायी घेऊन जाणारी तीन वाहने मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. या वाहनातील 49 गाय, वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथक प्रमुख सपोनि.विलास हजारे यांना गायी कत्तलखाण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी […]

Continue Reading

मोर्चाला विरोध करणार्‍यानो काळ तुम्हाला माफ करणार नाही- रमेश पोकळे

बीड दि.4 : 2015 मध्ये मी सत्ताधारी भाजप पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावेे म्हणून बैठका सुरु झाल्या. तेव्हा मी त्यामध्ये सहभागी होतो. पक्षाची काहीही भूमिका असो. पक्ष भूमिका घेईल न घेईल मला माहित नाही. पण एक मराठा म्हणून मी नेहमी समाजासोबत राहिलो. राजकारण करु नका म्हणणारी काही लोकं या मोर्चाला विरोध करत […]

Continue Reading
vinayak mete

आ.मेटेंची प्रस्थापित मराठा नेत्यांना सणसणीत चपराक

बालाजी मारगुडे । बीड दि. 5 : आ.विनायक मेटे यांचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा होऊच नये यासाठी राजे-महाराजे, रथी-महारथी, स्थानिकच्या प्रस्थापित मराठा नेत्यांसह राज्याच्या राजकारणातील मराठा मंत्र्यांनी बीडमध्ये इकडून-तिकडे, तिकडून-इकडे टुणूक-टुणूक उड्या मारत फोनफोनी करीत मोर्चा निघूच द्यायचा नाही, यासाठी शक्ती पणाला लावली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि प्रशासनावर मोर्चा न काढण्यासाठी मोठा दबाव […]

Continue Reading