court

‘त्या’ 40 जणांना तलाठीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा!

बीड दि.2 :  मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) वगळून उर्वरित उमेदवारांना शासनाच्या पत्रानुसार तात्काळ तलाठीपदी नियक्त्या देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे एसईबीसी वगळता इतर तलाठी पदासाठी पात्र उमेदवाराला नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने 2019 साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली होती. बीड जिल्ह्यात 47 तालाठ्यांची भरती […]

Continue Reading

गोदावरी नदीपात्रात शॉक बसल्याने शेतमजुराचा मृत्यू

माजलगाव दि.1 : शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात टाकलेली मोटार बिघडल्याने दुरूस्तीसाठी गेलेल्या 30 वर्षी शेतमजुरांचा शॉक लागून मृत्यु झाला. ही घटना तालुकयातील मोगरा येथे मंगळवारी दुपारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शेतमजुर गजानन मारोतराव शिंदे (वय 30 वर्षे) हे गोदावरी नदीतून शेतीसाठी पाणी घेत होते. या दरम्याण विद्युत […]

Continue Reading
accedent

अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो रिक्षा पलटी; चार प्रवाशी जखमी

बीड दि.1 :  प्रवाशी घेऊन जाणार्‍या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी झाल्याने चार प्रवाशी जखमी झाले. तर एक प्रवाशाची प्रकृती चिंताजणक आहे. हा अपघात परळी-सिरसाळा रस्त्यावर मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ब्रम्हवाडी शिवारात झाला. ब्रम्हवाडी येथून अ‍ॅटो रिक्षा (एम.एच.23 टी.आर.311) हा काही प्रवाशांना घेऊन परळीकडे निघाला होता. टोकवाडी जवळ या रिक्षाला अज्ञात […]

Continue Reading
accident

टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

बीड दि.1 : रस्त्याने जात असलेल्या वृद्धाला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.1) सकाळी 11 च्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी फाटा येथे घडली. शंकर तात्याबा जाधव (वय 70 रा.कोळवाडी ता.बीड) असे मयत वृद्धाचा नाव आहे. ते सकाळी रस्त्याच्याकडेने जात असताना बीड तालुक्यातील कोळवाडी फाटा येथील बस स्टॅन्डसमोर […]

Continue Reading
crime

जळून कोळसा झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला

अंबाजोगाईतील घटना; घातापाताचा संशय  अंबाजोगाई  दि.30 ः अंबाजोगाई नजीक असलेल्या पोखरी शिवारात सोमवारी (दि.30) दुपारी 55 वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच बाजूचा सोयाबीनचा ढिगाराही जाळून खाक झाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे कि घातपात किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.       काशीबाई विष्णू निकम (वय […]

Continue Reading
bibatya

माजलगाव तालुक्यातही आढळला बिबट्या

माजलगाव- तालुक्यातील सावरगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली गोरे यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे. तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे रविवारी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.111 मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड […]

Continue Reading

बिबट्याच्या आणखी एक हल्ला; जोगेश्वरी पारगाव मधील महिलेचा मृत्यू

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला होता ती घटना होत नाही तोच बिबट्याने आणखी एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 जण ठार झाले आहेत.सुरेखा निळकंठ भोसले वय 45 असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार आष्टीपासून 11 […]

Continue Reading