तांबाराजुरीत बिबट्याचे दर्शन!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तांबाराजुरी दि.29 : पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावात रविवारी (दि.29) सकाळी 10 च्या सुमारास तांबाराजुरी-चुंबळी फाटा मार्गावरील सरकारी विहिरीजवळ बिबट्या दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.       तांबाराजुरीपासून 500 मीटर अंतरावर सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीच्या शेजारी एक बंधारा असून या बंधार्‍यावर कपडे धुणार्‍या तरुणीस […]

Continue Reading

बिबट्याचा आष्टी तालुक्यात धुमाकूळ! रविवारी पुन्हा एका महिलेवर हल्ला!!

आष्टी- तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका महिलेवर हल्ला केला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अष्टीपासून 11 ते 12 किमी अंतरावर असलेल्या पारगाव बोराडे येथील वस्तीवरील शाळांबाई शहाजी भोसले ही महिला शेतात भाजी आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात शालन बाई यांच्या नरडीला जखम […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे कोरोनाने निधन! पुण्यात घेतला अखेरचा श्वास!

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं करोनामुळे निधन झालं.पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. […]

Continue Reading

बीडचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते

डॉ.अशोक थोरात यांना मिळणार बढती बीड दि.26 : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना शासनाकडून बढती मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांच्या ठिकाणी डॉ.सुर्यकांत गिते यांची गुरुवारी (दि.26) नियुक्ती करण्यात आली आहे.       सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत रामचंद्र गिते यांची बीडचे नवे […]

Continue Reading

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एक गंभीर

गेवराई : भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासवर गुरुवारी (दि.26) सकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष […]

Continue Reading

अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन

बीड : छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर (आप्पा) पाटील यांचं गुरुवारी (दि.26) पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते. गरीब कुटुंबात जन्म घेऊन आप्पा यांनी मोठे उद्दोगाचे जाळे निर्माण केले होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. शाहू विद्यालय, लक्ष्मणराव जाहेर विद्यालयात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात […]

Continue Reading
nagnath garje bibatya attack

पंचायत समिती सदस्यपती नागनाथ गर्जे बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार

आष्टी येथील खळबळजनक घटना आष्टी- दि.24 : आष्टी तालुक्यातील सुरुडी पंचायत समिती गणाच्या सदस्य आशाबाई गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्‍यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.सध्या शेतात पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्यावेळी पाणी देण्याशिवाय […]

Continue Reading