मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात! गावात शांतता!!

मातोरी : मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड येथून दर्शन […]

Continue Reading
MATORI

मनोज जरांगेंच्या मातोरीत दोन गटात मोठी दंगल, डीजे, दुचाकी फोडल्या, अनेकांची डोकी फुटली

मातोरी, (ता. शिरूर जि. बीड) दि.27 : शिरूर तालुक्यातील मातोरी गावात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावात दोन समाजाचे दोन गट आमने सामने आल्याने प्रचंड दंगडफेक झाली. अनेक दुचाकी फुटल्या आहेत. डीजेचे देखील मोठं नुकसान झालेले आहे. सध्या मातोरी गावाच्या आजुबाजुने प्रचंड संख्येने लोक जमा झालेले असून परिसरात तणावाची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिकखांडेंच्या कार्यालयाची तोडफोड!

बीड- दि. 27 : पंकजाताई मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत यावेळी आपण धोका दिल्याचे सांगत बजरंग सोनवणे यमाडत केल्याची कबुली दिली, यासह इतर चर्चेची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर आज गुरूवारी (दि.27) सायंकाळी कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी […]

Continue Reading
acb trap

आठ लाखाच्या लाचेची मागणी; माजलागावचा सुपर क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

केशव कदम | बीड बीड दि.27 : लाचखोरी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी अहमदनगर येथील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.पंकज जावळे यांनी आठ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.पंकज जावळे हे मूळचे माजलगाव तालुक्यातील असून या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading

गणेश मुंडेंकडे बीड स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार!

बीड दि.26 : येथील स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बुधवारी (दि.26) बदली झाली असून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. 3 जुलै 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या एक वर्षाच्या पूर्वीच साबळे यांची नियंत्रण कक्षात […]

Continue Reading

जिल्ह्यात एटीएम मशीन पळविणाऱ्यांचे पोलीसांना आव्हान!

धारूर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री पळवले पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह धारूर दि. 22 : शहरात धारूर माजलगाव हायवे लगत भारतीय स्टेट बँकेची शाखा कार्यान्वित आहे.याच शाखेच्या समोरील बाजूला बँकेचे एटीएम मागील अनेक वर्षापासून उभा करण्यात आलेले आहे. शनिवार रोजी पहाटेपूर्वीच सदरील एटीएम एका पिकअपच्या साह्याने चोरट्यांनी मध्यरात्रीच पळवून नेल्याची घटना […]

Continue Reading

धारूर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री पळवले

किल्ले धारूर/ सचिन थोरात दि. 22 : धारूर शहरात धारूर माजलगाव हायवे लगत भारतीय स्टेट बँकेची शाखा कार्यान्वित आहे.याच शाखेच्या समोरील बाजूला बँकेचे एटीएम मागील अनेक वर्षापासून उभा करण्यात आलेले आहे. शनिवार रोजी पहाटेपूर्वीच सदरील एटीएम एका पिकअप च्या साह्याने चोरट्यांनी मध्यरात्रीच पळवून नेल्याची घटना घडल्याचे पहाटेच्या नंतर पोलीस आणि बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.सदरील एटीएम […]

Continue Reading

ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटेना पाच दिवसाची कोठडी!

बीड दि. 17 : माजलगाव येथील गुन्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक अशिष पाटोदेकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर माजलगाव न्यायालयात पुन्हा हजर केल्यानंतर कुटेंची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना होम अरेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर रविवारी (दि.16) बीड शहर ठाण्याच्या गुन्ह्यात कुटेंना बीड येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळीही […]

Continue Reading

धारूरच्या चौकात रात्रीतून बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

सचिन थोरात, धारूर दिनांक 14 : ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात मागील दोन दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी मधून सातत्याने केली जात होती.परंतु प्रशासनाने अद्याप कायदेशीर मान्यता दिलेली नसल्याने संतप्त शिवप्रेमींनी 14 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या वेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या […]

Continue Reading

लाज सोडली : बीडमध्येपुन्हा एक लाचखोर पकडला!

बीड दि. 7 : बीड जिल्ह्यात लाचखोरांची संख्या आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागील 15 दिवसात तब्बल 11 लाचखोर एसीबीने पकडले, त्यानंतर आज पुन्हा एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या सततच्या कारवायामुळे बीड जिल्हा लाचखोरांचा जिल्हा घोषित करण्याची वेळ आली आहे. केज तालुक्यातील एका संस्थेतील सोनवणे नामक मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडे दाखल्याची […]

Continue Reading